Sunday, April 19, 2009

माझ्या प्रोफाइल मध्ये / फोटोमध्ये व कोणा जिवंत वा मृत व्यक्ती मध्ये जर काही साम्य आढळल्यास. तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या प्रोफाइल मुळे कोणा व्यक्तीच्या वा गटाच्या अथवा कोणाच्याही भावना कुठल्याही प्रकारे दुखावल्या गेल्यास मी जबाबदार नाही. येथे व्यक्त होणा-या प्रत्येक स्क्रॅपशी मी नेहमीच सहमत असेनच असे नाही. अनेकविध कम्युनिटीवर पोस्ट केलेली मते म्हणजे माझ्या ख-या भावना, मत किंवा विचारसरणी असेलच असे नाही. ह्या संबंधि जर काही तंटे, बखेडे, वाद आदी निर्माण झाले तर कारवाई मा. दंडाधिकारीसाहेब, पुणे,पुणे ज्युरिसडिक्शन, जि. पुणे (महा.) भारत. ह्यांच्या आधिन राहून.

____________________________________________________________________



अबाऊट "मी". "मी" ची थोडी माहिती सांगतो. ’मी’ हे प्रथमपुरूषी सर्वनाम आहे. मराठी मध्ये ’मी’ पणाला वाईट समजतात. खुप कमी लोकांना स्वत: मधील ’मी’ ओळखता येतो. आणि ज्या लोकांना ’मी’ समजलेला असतो त्यांना सोडून सगळ्यांना ’मी’ चा अभिमान असतो. लहानपणी शाळेत असताना ’मी’ वरुन सुरू होणारे खुप निबंध लिहिले. जसे ’मी पुस्तक असतो तर’, ’मी पंतप्रधान झालो तर’, ’मी आणि माझी शाळा’ इत्यादि...